भारती सोळंके-धुपद यांचा 'सूर्याला आला ताप' हा बालकविता संग्रह. प्रत्येक माणसाच्या मनात एक लहान मूल दडलेलं असतं या उक्तीची साक्ष पटवणाऱ्या ह्या बालकविता आहेत. बालकवितेत अपेक्षित असलेल्या निसर्गातल्या पानं, फुलं, झाडं, सूर्यचंद्र, चांदण्या, प्राणी पक्षी ह्या सगळ्यांवरच्या या कविता आहेत. या बालमनाला रिझवणाऱ्या आणि आनंदी करणाऱ्या कवयित्री स्वतः बाल होऊन त्याच्याशी एकरूप होताना दिसतात. निसर्गाची ओळख करून देता देता पर्यावरणाच्या रक्षणासंबंधी कवयित्री मुलांना सजग करतात. 'वाचाल तर वाचाल' म्हणत पुस्तकांची महती सांगतात. आई-बाबा आणि गुरू ऋणाची जाणीव देतात. पाण्याची जपणूक करायला सांगतात. साध्यासोप्या शब्दातला मोठा आशय घेऊन आलेल्या ह्या कविता मुलांना नक्कीच आवडतील. (अभिप्रायातून)
- New audiobook additions
- New kids additions
- New teen additions
- Most popular
- Memoir Audiobooks Read by the Author
- See all audiobooks collections
- Food & Cooking
- News & Politics
- Celebrity
- Travel & Outdoor
- Business & Finance
- Fashion
- Art & Architecture
- Culture & Literature
- Family & Parenting
- Hunting & Fishing
- Tech & Gaming
- Health & Fitness
- Crafts & Hobbies
- See all magazines collections